US Visa Rules: अमेरिकेचा मोठा निर्णय! आता भारतीयांना परदेशात व्हिसा इंटरव्ह्यू देता येणार नाही; NIV इंटरव्यूच्या नव्या अटी लागू
US Visa Rules: अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नॉन-इमिग्रंट वीजा (NIV) इंटरव्यू नियमांमध्ये अमेरिकेने महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आता अर्जदारांना इंटरव्यू देण्यासाठी परदेशात जाण्याची मुभा राहिलेली नाही. भारतीय नागरिकांनी NIV वीजा मिळवण्यासाठी केवळ भारतात किंवा आपल्या कायदेशीर राहत्या देशातच इंटरव्यू द्यावा लागणार आहे.
यामुळे अनेक भारतीयांना मोठा फटका बसणार आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषतः कोविड-19 महामारीनंतर, भारतातील वीजा अपॉइंटमेंटसाठी प्रचंड प्रतीक्षा होती. तीन वर्षांपर्यंत अपॉइंटमेंट न मिळाल्याने लोकांना परदेशात जाऊन लवकर इंटरव्यू देण्याचा पर्याय वापरावा लागत होता. थायलंड, सिंगापूर, जर्मनी, अगदी ब्राझीलसारख्या ठिकाणीही भारतीय नागरिकांनी जाऊन वीजा मुलाखती दिल्या होत्या. पासपोर्ट परत मिळताच ते भारतात परतत असत.
आता मात्र या सोयीवर अमेरिकेने पूर्णविराम दिला आहे. 2 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार, वयाची कोणतीही मर्यादा नसून ; 14 वर्षांखालील मुलांपासून 79 वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थेट काउंसलर इंटरव्यूला सामोरे जावे लागेल. हेही वाचा: Russia cancer vaccine: कर्करोगमुक्त जगाचे स्वप्न आता वास्तवात? रशियाची लस चर्चेत
कोणावर होणार परिणाम?
हा बदल B1 (बिझनेस), B2 (टुरिस्ट), स्टुडंट्स, तात्पुरते कामगार आणि अमेरिकन नागरिकांशी विवाह करून वीजा घेणाऱ्यांवर लागू होणार आहे. त्यामुळे अल्पावधीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या लोकांना विशेष अडचण येण्याची शक्यता आहे.
भारतातील विद्यमान वेट-टाईम
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, भारतातील वीजा मुलाखतीसाठी प्रतीक्षा अशी आहे:
-
हैदराबाद व मुंबई: सुमारे 3.5 महिने
-
नवी दिल्ली: सुमारे 4.5 महिने
-
कोलकाता: सुमारे 5 महिने
-
चेन्नई: तब्बल 9 महिने
इतक्या दीर्घ प्रतीक्षेमुळे भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक परदेशातील दूतावासांमध्ये जाऊन अर्ज करत असत. आता तो मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. हेही वाचा: Food Delivery Became Expensive: Zomato आणि Swiggy वरून जेवण ऑर्डर करणे महागले; मॅजिकपिन देत आहे सर्वात स्वस्त फूड डिलिव्हरी
काही अपवाद मात्र शिल्लक
ज्यांच्याकडे आधीच B1, B2 किंवा B1/B2 वीजा होता आणि तो मागील 12 महिन्यांत कालबाह्य झाला असेल, तसेच अर्जदाराचे वय त्या वेळी 18 वर्षांपेक्षा जास्त असेल, अशा काही प्रकरणांमध्ये इंटरव्यूची अट शिथिल होऊ शकते. मात्र ही मुभा अत्यंत मर्यादित लोकांनाच मिळणार आहे.
भारतीयांसाठी परिणाम काय?
भारतातून अमेरिकेला शिक्षण, नोकरी वा पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. कोविडनंतर परदेशातील मुलाखती हा एक महत्त्वाचा पर्याय ठरला होता. नव्या नियमानंतर विद्यार्थ्यांना वेळेत व्हिसा न मिळाल्यास अभ्यासक्रम चुकण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही करार, मिटिंग्ज उशिरा होऊ शकतात.
तज्ञांच्या मते, हा निर्णय अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेला अधिक कठोर आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु अल्पावधीत भारतीय अर्जदारांवर याचा ताण जाणवणार हे निश्चित.