क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांच्या घटस्फोटाच्या चर्

वीरेंद्र सेहवाग आणि आरतीच्या नात्याला तडा जाणार?

मुंबई : आपल्याला सेलिब्रिटी घटस्फोटाच्या चर्चा वारंवार पाहायला मिळत असतात. अशातच क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. सेहवाग आणि आरतीच्या नात्याला तडा गेल्याची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती आहे. या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं असल्याची चर्चा आहे. 

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा समाज माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. सेहवाग आणि आरती यांच्यामध्ये काही काळापासून दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. मागच्या काही महिन्यांपासून ते दोघंही वेगळं राहत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मात्र अद्याप सेहवाग आणि आरती या दोघांनीही याबद्दल जाहीरपणे सांगितले नाही. पण लवकरच सेहवाग आणि आरती त्यांच्या घटस्फोटाबद्दल जाहीर करतील असे सांगितले जात आहे. त्या दोघांनीही एकमेकांना  इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होतं. ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. सेहवाग आणि आरती यांचे लग्न 2004 मध्ये झालं होतं. त्यांना आर्यवीर आणि वेदांत ही दोन मुले आहेत. 

हेही वाचा : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

विरेंद्र सेहवाग हा फक्त बॅटिंगच नाही. तर उत्कृष्ट कॉमेंट्रिसाठीही ओळखला जातो. सेहवाग आणि आरती यांच्या 20 वर्षांच्या नात्याला तडा गेला. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दिवाळी सणादरम्यानही सेहवाग याने त्याची मुले आणि आईसोबत फोटो शेअर केले होते. मात्र आरती कुठेही दिसली नाही. यामुळेही चर्चांना उधाण आले आले. वीरेंद्र आणि आरती दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर मौन बाळगले आहे.