भरल्या ताटावर विद्यार्थ्यांना आलं मरण! मेसमधील धक्कादायक व्हिडिओ आला समोर
अहमदाबाद: गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानाच्या अपघातात विमानात बसलेल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे हे विमान उड्डाण घेताच कोसळले. हे विमान विमानतळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजमधील मेस असलेल्या इमारतीवर पडले. जेव्हा विमान मेस असलेल्या इमारतीवर पडले तेव्हा येथे विद्यार्थी दुपारचे जेवण करत होते.
हेही वाचा - Video Before Crash: टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे क्षण अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं
भरल्या ताटावर विद्यार्थ्यांचा मृत्यू
ज्यावेळी एअर इंडियाचं विमान मेसच्या इमारतीवर आदळले तेव्हा नेमकी काय घडलं? याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एअर इंडियाच्या विमानाचा मागचा भाग हॉस्टेल मेसवर आदळला. एअर इंडियाच्या विमानाचे अनेक भाग इमारतीची भिंत तोडून आत घुसले. यामुळे सर्वत्र आग लागली. यामुळे अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे जेवणाचे ताटं देखील दिसत आहे. त्यामुळे भरल्या ताटावर काळाला या विद्यार्थ्यांवर घाळा केल्याचं आता या व्हिडिओवरून दिसून येत आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! एअर इंडियाच्या बोईंग विमानांची चौकशी होणार; अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA चा आदेश
दरम्यान, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तेथील सुमारे 56 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप, बीजे मेडिकल कॉलेजमधील किती विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. तथापि, आज एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जाईल. ब्लॅक बॉक्सची तपासणी 2 प्रकारे करता येते. जर भारतात ब्लॅक बॉक्सची तपासणी केली तर अहवाल येण्यासाठी 2 ते 4 दिवस लागू शकतात. तसेच दुसरीकडे, जर ब्लॅक बॉक्सची तपासणी बोईंग कंपनी किंवा बोईंगच्या इंजिन उत्पादक कंपनीद्वारे केली तर अहवाल येण्यासाठी 10 ते 15 दिवस लागू शकतात, कारण जनरल इंजिनचे मुख्यालय अमेरिकेतील सिएटल येथे आहे.