पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले MY-Bharat कॅलेंडर काय आहे? जाणून घ्या
MY-Bharat Calendar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात भाषण दिले. यावेळी, त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MY-Bharat कॅलेंडरचा उल्लेख केला. उन्हाळी सुट्ट्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी याचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी देशातील विद्यार्थ्यांना, विशेषतः तरुणांना, 'माय भारत कॅलेंडर'बद्दल सांगितले. पंतप्रधान मोदींनी या माय भारत कॅलेंडरद्वारे तरुण त्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा विविध स्वयंसेवी कामांमध्ये कसा चांगला वापर करू शकतात हे सांगितलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत सामाजिक कार्य करा -
यासंदर्भात मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा परीक्षा येतात तेव्हा मी परीक्षांबद्दल चर्चा करतो. आता परीक्षा सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी नवीन सत्र देखील सुरू झाले आहे. काही काळानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ येणार आहे. मुले त्याची खूप वाट पाहतात. उन्हाळ्याचे दिवस मोठे असतात. मुलांना त्यात खूप काही करायचे असते. हा एक नवीन छंद जोपासण्याचा काळ आहे. या सुट्ट्यांमध्ये सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी देखील आहे. मी विनंती करतो की जर कोणतीही संस्था असे उपक्रम राबवत असेल तर तुमचे उपक्रम #MyHoliday सोबत शेअर करा. यामुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही माहिती मिळेल.
हेही वाचा - गरिबाचा मुलगा डॉक्टर बनावा म्हणून डॉक्टर बनण्याची सुविधा उपलब्ध; नागपूर दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींचे उद्गार?
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माय भारत कॅलेंडर -
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं की, आज मी तुमच्याशी उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत कॅलेंडरबद्दल चर्चा करेन. या अभ्यास दौऱ्यात, तुम्हाला आमची जनऔषधी केंद्रे कशी काम करतात हे जाणून घेता येईल. सीमावर्ती गावांमध्ये तुम्हाला यातून एक अनोखा अनुभव मिळू शकतो. आंबेडकर जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी होऊन, तुम्ही संविधानाच्या मूल्यांबद्दल माहिती देखील पसरवू शकता. तुमचे अनुभव #HolidayMemories सोबत शेअर करा, असं आवाहन देखील मोदींनी यावेळी केलं.
हेही वाचा - PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान मोदी नागपूमधे दाखल; हेडगेवार स्मृतीस्थळ आणि दीक्षाभूमीला वंदन
माय भारत कॅलेंडर काय आहे?
माय भारत पोर्टलवर एक खास प्रकारचे कॅलेंडर बनवण्यात आले आहे. या कॅलेंडरमध्ये विविध प्रकारच्या स्वयंसेवक कामांची यादी करण्यात आली आहे. ही स्वयंसेवी कामे देशाच्या वेगवेगळ्या भागात केली जाणार आहेत. यामध्ये ट्रेकिंगपासून ते जागरूकता मोहिमांपर्यंतचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. यामध्ये या कार्यक्रमांच्या तारखेपासून ते त्यांच्या ठिकाणापर्यंतची माहिती देण्यात आली आहे. इच्छुक तरुण या कॅलेंडरद्वारे त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या स्वयंसेवक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तरुणांसाठी ही एक नवीन संधी असेल.