Tamil Nadu Tragedy : भयंकर! सर्व्हिस लिफ्टमध्ये केस अडकल्याने महिलेचा जागीच मृत्यू; घटनेनं परिसरात खळबळ
Tamil Nadu Tragedy: तामिळनाडूमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील त्रिची शहरातील गांधी मार्केटजवळील एका व्यावसायिक संकुलात गुरुवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:45 वाजता एक भयानक अपघात घडला. खाजगी हार्डवेअर कंपनीत काम करणाऱ्या 52 वर्षीय डी. सुमती यांचे केस सर्व्हिस लिफ्टच्या दरवाज्यात अडकले. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - DD Lapang Passes Away: मेघालयचे माजी मुख्यमंत्री डी.डी. लपांग यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्राप्त माहितीनुसार, सुमती तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत होत्या, यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर मार्केट पोलिस घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर मार्केट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुमती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी स्मारक सरकारी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, यापूर्वी गुजरातमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. नवसारीच्या विजलपुरा भागातील नीरव स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी एका 5 वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला होता. सुरत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या सार्थकच्या मृत्यूमुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली होती. या घटनांनी सुरक्षितता उपाययोजना आणि लिफ्टच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.