काँग्रेसच्या मतदार हक्क यात्रा दरम्यान रफिकचा एक व

Congress Darbhanga Rally: पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला अटक; राहुल गांधींवरही गुन्हा दाखल

Congress Darbhanga Rally: बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविरुद्ध अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या रफिक नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेसच्या मतदार हक्क यात्रा दरम्यान रफिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो घोषणाबाजी करताना अपमानास्पद टिप्पणी करताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या भाषेने केवळ द्वेष आणि गलिच्छ राजकारणाला प्रोत्साहन मिळते. त्यांच्या मते, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अशी भाषा वापरण्यात आली आणि त्यांनी त्याला विरोधही केला नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून काँग्रेसच्या विचारसरणीचे प्रतीक असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राहुल गांधींवर एफआयआर दाखल वाद गंभीर होत असल्याचे पाहून भाजपने पाटण्यात राहुल गांधींविरुद्ध एफआयआर दाखल केला. भाजपचे म्हणणे आहे की राहुल गांधींनी या आक्षेपार्ह घोषणांचा निषेध न करता मौन बाळगले, यामुळेच ते सह-अपराधी ठरतात. तसेच भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी देशासमोर माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा - Mohan Bhagwat On Family Planning: 'हम दो, हमारे तीन...'; मोहन भागवत यांचे जनतेला आवाहन

पोलिसांची जलद कारवाई या प्रकरणाने जोर धरताच पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडिओच्या आधारे आरोपी रफिकची ओळख पटवण्यात आली आणि त्याला दरभंगा येथून अटक करण्यात आली. मात्र, या अटकेबाबत अद्याप अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा - PM Modi to Meet Xi Jinping: भारताची रणनीती! पंतप्रधान मोदी 31ऑगस्टला घेणार शी जिनपिंग यांची भेट

राजकीय वातावरण तापले या घटनेनंतर राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली.  बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना अशा प्रकारच्या वादग्रस्त घटनांनी दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. भाजप या प्रकरणाला काँग्रेसच्या मानसिकतेशी जोडून आक्रमक भूमिका घेत आहे, तर काँग्रेसने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, हा वाद केवळ बिहारपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राष्ट्रीय राजकारणातही त्याचे पडसाद उमटले आहेत. आगामी काळात हा मुद्दा निवडणुकीत किती गाजतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.