OMG! हा माणूस चक्क 6 वेळा मेला आणि परत जिवंत झाला! लोक काय म्हणाले माहीत आहे..?
Man Revival After Death : मृत्यूनंतर जीवन खरोखर शक्य आहे का? हा प्रश्न नेहमीच मानवांना गोंधळात टाकत आला आहे. विज्ञान म्हणते की, मृत्यू हा शेवट आहे. परंतु, यावर प्रश्न उपस्थित करणारी एक कथा आहे. टांझानियाच्या इस्माईल अझीझी यांचे जीवन देखील असेच आहे, ज्या व्यक्तीला सहा वेळा मृत घोषित करण्यात आले होते. परंतु, प्रत्येक वेळी ते चमत्कारिकरीत्या पुन्हा जिवंत झाले.
मृत्यू आणि जीवनापूर्वीचे आणि जीवनानंतरचे सत्य काय आहे, याबद्दल अनेक सिद्धांत आणि अनेक चमत्कार आहेत. असे मानले जाते की, मृत्यूनंतर जिवंत होणे अशक्य आहे. परंतु. जगात एक माणूस आहे ज्याने एकदा नाही तर, सहा वेळा मृत्यूला चकवले आहे. टांझानियाचे रहिवासी इस्माईल अझीझी सहा वेळा मरण पावले असे सर्वांना वाटले आणि अखेर प्रत्येक वेळी ते पुन्हा जिवंत झाले.
अफ्रिमॅक्स इंग्लिशने नायरलँडद्वारे बनवलेल्या अलीकडच्या माहितीपटानुसार, अझीझी सहा वेळा मरणानंतर पुन्हा जिवंत झाल्याचे वृत्त आहे. प्रत्येक वेळी त्यांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले. तेव्हा ते जिवंत आणि श्वास घेत असलेल्या स्थितीत आढळला, ज्यामुळे डॉक्टर आणि आजूबाजूचे लोकही स्तब्ध झाले.
इस्माईल अचानक शवागारात जागे झाले अजीझी यांचा पहिला मृत्यू कामाच्या ठिकाणी झालेल्या एका गंभीर अपघातानंतर झाला होता. त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवागारात ठेवण्यात आले आणि त्यांच्या दफनविधीची तयारी सुरू झाली. परंतु, अंत्यसंस्कारापूर्वी ते उठले आणि तेथून बाहेर पडले. "ते मला शवागारात घेऊन गेले. पण जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मला खूप थंडी वाजत होती. सुदैवाने शवागार बंद नव्हते आणि मी बाहेर पडलो. जेव्हा माझ्या कुटुंबाने मला पाहिले, तेव्हा ते पळून गेले कारण त्यांना वाटले की मी भूत आहे," त्यांनी आफ्रिमॅक्सला सांगितले.
हेही वाचा - Russia-Ukraine War : युद्धामुळे युक्रेनियन मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत! शिकण्यासाठी अवलंबावा लागतोय हा मार्ग
ते दुसऱ्यांदा मरण पावले आणि नंतर पुन्हा जिवंत झाले दुसऱ्यांदा इस्माइल यांना मलेरिया झाला आणि त्यांना पुन्हा मृत घोषित करण्यात आले. परंतु, त्यानंतरही ते पुन्हा श्वास घेऊ लागले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शवपेटीत ठेवण्याची तयारी करताच ते पुन्हा जिवंत झाले. एवढ्यावरच थांबले नाही. मलेरियानंतर, एकदा ते सापाच्या चाव्याने मरण पावले. नंतर ते एका खोल खड्ड्यात पडले आणि मरण पावले. शेवटच्या वेळी त्यांचा मृतदेह तीन दिवस शवागारात पडला होता.
अजीझी यांनी कधीही कोणालाही इजा केली नाही. मात्र, स्थानिकांना संशय आला आणि त्यांच्या मेल्यानंतरही वारंवार परत येण्याचा संबंध काळ्या जादू किंवा अलौकिक शक्तींशी आहे. काहींनी तर त्यांच्यावर जादूटोण्याचा आरोपही केला. आता एका मोडकळीस आलेल्या घरात एकटे राहून, अझीझी थोडी-फार शेती, स्वयंपाक आणि साफसफाई करून जगतात.
आफ्रिमॅक्सच्या मते, त्यांना शापित किंवा अमर मानले जाते आणि आता त्यांना त्यांच्या समुदायाकडून किंवा कुटुंबाकडून कोणतीही सहानुभूती किंवा मदत मिळत नाही. या सर्व घटनांनंतर अझीझी शांत आहेत. पण आता ते थकलेले आहेत. त्यांची कहाणी चमत्कारासारखी वाटू शकते. परंतु, अझीझींसाठी ती एकटेपणाचे कारण ठरली आहे. ते म्हणाले, "मी जेव्हा जेव्हा मृत्यूतून परत आलो, तेव्हा मला माझ्या शरीरात एक विचित्र भावना जाणवत होती. लोक माझ्याशी असे वागू लागले, जसे की मी जादूटोणा करत आहे."
खरे तर, मृत्यूच्या जबड्यातून वारंवार सुटणे ही एखाद्याला भाग्याची घटना वाटू शकते. मात्र, अझीझी यांच्यासाठी हे 'वरदान समजावे की शाप' अशी विचित्र स्थिती झाली आहे. कारण त्यांचा जीव तर अनेक वेळा वाचला ही नक्कीच मोठी बाब आहे. पण वारंवार घडलेल्या अशा घटनांमुळे त्यांना एकाकी जीवन जगावे लागत आहे. त्यांना कोणीही आपले माणूस उरलेले नाही. अझीझी यांच्यासमोर त्यांच्या नियतीने मृत्यूला पर्याय म्हणून अशा प्रकारचे जीवन जगणे नशिबात येणे वाढून ठेवले आहे.
हेही वाचा - Ancient Tomb Robbery : खजिन्याच्या शोधात चोरांनी कबर उकरून काढली आणि जे सापडलं..