Investment Rule: 50 हजार पगारात दोन कोटींचा फंड 'हा' फॉर्म्युला ठरेल मास्टरमाईंड, जाणून घ्या नक्की काय आहे ट्रिक?
Investment Rule: जर तुमचा पगार 50 हजार रुपये असेल आणि तुम्हालाा दोन कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. योग्यप्रकारे बजेट प्लॅनिंग आणि गुंतवणूक केल्यास हे शक्य होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या पगारानुसार समजूतदारपणे खर्च करावा लागेल आणि ठराविक रकमेची गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला 50-30-10-10 फॉर्म्युला फायदेशीर ठरेल.
50-30-10-10 फॉर्म्युला नेमका काय?
खर्च आणि गुंतवणुकीचे नियोजन करायचे असेल तर हा नियम अंमलात आणावाच लागेल. ज्यामध्ये आवश्यक गोष्टी, बचत गुंतवणूक आणि छंद जोपासण्यासाठी योग्य प्रकारे खर्च करता येऊ शकतो. जर तुम्हाला 50 हजार रुपये पगार असेल तर या नियमानुसार 50 टक्के रक्कम म्हणजेच 25 हजार रुपये तुमच्या रोजच्या आवश्यक गरजांसाठी वापरता येईल. यात घरभाडे, वीज, पाण्याचे बिल, मुलांचे शिक्षण, किचनमधील साहित्य आणि ईएमआय यासारखे खर्च करता येतील.
यानंतर 30 टक्के रक्कम म्हणजे 15 हजार रुपये तुमचा छंद जोपासणे आणि लाईफस्टाईलवर खर्च करता येईल. यात फिरायला जाणे, शॉपिंग करणे, मुव्हीला जाणे या गोष्टी करता येतील.
पगारातील तिसरा म्हणजेच 10 टक्के रक्कम 5 हजार रुपये गुंतवणुकीसाठी असतील. यात तुम्ही म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट, गोल्ड पीपीएफ यासारखे पर्याय निवडू शकता. यामध्ये पैसे लावा, जे तुमच्यासाठी भविष्यात कामी येईल.
हेही वाचा: Gold-Silver Rates Today: सोन्याच्या किमतीत घसरण! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे चौथा आणि शेवटचा भाग 10 टक्के म्हणजे 5 हजार रुपये जे आपत्कालीन फंड आणि विम्यासाठी ठेवावेत. वैद्यकीय अडचण अचानक आल्यास या फंडातील रक्कम तुम्ही वापरु शकता. ज्यामुळे तुम्हाला कर्ज काढायला लागणार नाही.
2 कोटी रुपयांचा फंड कसा तयार करायचा? 50 हजार रुपये पगार असल्यास 2 कोटींचा फंड कसा तयार करायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु, योग्य नियोजन आणि शिस्तबद्धपणे गुंतवणूक करावी लागेल. दरमहा 5 हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा, वार्षिक 12 टक्के सीएजीआर मिळाला तर 31 वर्षात 2 कोटींचा फंड तयार होईल. 31 वर्ष हा कालावधी अधिक असेल तर तुम्ही दरमहा 5 हजार रुपयांनी गुंतवणुकीला सुरुवात केल्यास आणि 10 टक्के स्टेप अप केल्यास वार्षिक 12 टक्के सीएजीआरनं 25 वर्षात 2 कोटी रुपयांचा फंड तयार होईल.
पगार ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी गुंतवणूक वाढवली पाहिजे. यामुळे पैसे वेगाने वाढतील आणि दोन कोटी रुपयांचा फंड लवकर तयार होईल. गुंतवणूक दीर्घकाळ करणं आवश्यक आहे. मध्येच पैसे काढल्याने किंवा एसआयपी थांबवल्याने तुमच्या फंडात मोठी रक्कम जमा होऊ शकणार नाही. जर तुम्हाला कमी कालावधीत 2 कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि गुंतवणूक वाढवावी लागेल. जर तुमच्या पगाराच्या 20 टक्के रकमेची गुंतवणूक केली आणि मिळालेला बोनस देखील खर्च करण्याऐवजी गुंतवणुकीसाठी वापरला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.