प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्षांपेक्षा अधिक वर्

Jan Dhan account KYC: जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी बंधनकारक, अन्यथा...

Jan Dhan account KYC: प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्षांपेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक खात उघडल्यानंतर दरवर्षी केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या खातेदारांचे कुठल्याही बँकेत जनधन खाते असेल तर त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जनधन खातेधारकांनी केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँक बंद होऊ शकतं. त्यामुळे सरकारी योजनांमधून  मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. 

जनधन योजनेची केवायसी आवश्यक  प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा हेतू आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना बँकिंगशी जोडण्याचा होता. जनधन खातं उघडल्यानंतर त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. या योजनेंतर्गत शहरातील लोकांसह ग्रामीण भागातील लाखो लोकांची बँक खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला खात्यात किमान रक्कम ठेवण्याचा नियम लागू नाही. खातेधारक ओवरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेऊ शकतात. म्हणजेच खात्यात पैसे नसताना देखील खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतो. त्यासाठी एक मर्यादा निश्चित केलेली असते. बँक ओवरड्राफ्टच्या रुपात काढलेल्या पैशांवर व्याज आकारते.  

हेही वाचा: RBI Instructions To Banks: ग्राहकांचा भार कमी होणार! RBI चा बँकांना ग्राहक शुल्क कमी करण्याचा सल्ला

2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची पुन्हा केवायसी करणे गरजेचे आहे. कारण केवायसी करण्याची मुदत 10 वर्षे आहे. बँक खाते चालू (सक्रीय) ठेवण्यासाठी रीकेवायसी करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही बँकेला तुमची अपडेटेड माहिती देता. ज्यात सध्याचा पत्ता, नाव, अपडेटेड फोटो इत्यादींंचा समावेश असतो. फसवणूक होऊ नये आणि बँकिंग सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. देशातील सरकारी बँका 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर केवायसीसाठी शिबिरे आयोजित करत आहे. या माध्यमातून घरोघरी जाऊन केवायसी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत 1 लाख ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो खातेदारांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.