ITR Filing Last Date: आज आयकर रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस; उद्यापासून लागणार 'इतका' दंड
ITR Filing Last Date: आज आर्थिक वर्ष 2025 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याचा अंतिम दिवस आहे. 15 सप्टेंबर नंतर आयकर रिटर्न वाढवण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, 14 सप्टेंबरपर्यंत एकूण 6,69,00,223 करदात्यांनी रिटर्न दाखल केले आहेत, परंतु सुमारे 1.3 कोटी करदात्यांनी अद्याप रिटर्न दाखल केलेले नाहीत. अंतिम मुदतीनंतर रिटर्न दाखल केल्यास दंडासह इतर गंभीर अडचणी येऊ शकतात.
15 सप्टेंबरची अंतिम मुदत कर ऑडिट अंतर्गत न येणाऱ्या व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंबे (HUF) आणि आयटीआर फॉर्म 1 ते 4 वापरणाऱ्या संस्थांना लागू होते. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास कलम 234F अंतर्गत उत्पन्न 5,00,000 पेक्षा जास्त असल्यास 5,000 आणि कमी उत्पन्न असल्यास 1,000 दंड आकारला जाईल. तसेच, उशिरा दाखल केलेल्या रिटर्नवर कलम 234A अंतर्गत मासिक 1 टक्के व्याज लागू होईल.
उशिरा रिटर्न भरण्यामुळे परतावा मिळण्यासही विलंब होतो आणि आयकर सूटसारख्या फायद्यांवर परिणाम होतो. आयकर कायद्याच्या कलम 139(1) नुसार, अंतिम मुदत चुकविल्यास पूर्वीच्या व्यवसाय तोटा, भांडवली तोटा किंवा इतर नुकसान समायोजित करण्याची संधी गमावता येते. करदात्यांना आयकर विभागाने आवाहन केलं आहे की, आजच आपला आयकर रिटर्न भरा, अन्यथा उद्यापासून दंडासह आर्थिक नुकसान आणि प्रक्रियेत विलंब सहन करावा लागू शकतो.