चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; अनेक जण जखमी

पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगवेळी चेंगराचेंगरी

हैद्राबाद : पुष्पा चित्रपटानंतर प्रेक्षकांना आतुरता होती हि पुष्पा 2 चित्रपटाची. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेल्या 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट दिनांक 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगची सुरुवात ही 30 नोव्हेंबर रोजी सुरु झाली होती. या चित्रपटानं 24 तासात तब्बल 7.08 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा 2' विषयी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. यामुळे हा चित्रपट आणखीनच हिट ठरणार आहे. 

मात्र यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगवेळी एक भयानक दुर्घटना घडली आहे. पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगवेळी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हैद्राबाद येथे हि दुर्घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच जण पुष्पा 2 या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. मात्र आता याच चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी हि दुर्दैवी घटना घडल्याने प्रेक्षकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. 

'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त आगाऊ बूकिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला असून  बिहार, गुजरात, आसाम आणि छत्तीसगडमध्ये या चित्रपटाची तिकिट मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. परंतु आता या दुर्घटनेनंतर या चित्रपटावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.