सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर मित्र
'अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार नाही'
मुंबई : महायुतीमध्ये मित्रपक्षांचे एकमेकांमध्ये पटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर मित्रपक्ष भाजपाने बहिष्कार टाकला आहे. सिल्लोड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. परंतु अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार नाही असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना पत्र लिहले आहे.