अभिनेता शरद कपूर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
मुंबई : सुप्रसिद्ध चित्रपट 'जोश', 'एलओसी कारगिल' आणि 'लक्ष्य' मध्ये काम करणारे अभिनेता शरद कपूर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद कपूर आणि पीडित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर कपूरने त्या 32 वर्षीय महिलेला आपल्या घरी कामासाठी बोलावले. घरी आल्यावर, शरद कपूरने महिलेला शारीरिकरीत्या चुकीच्या पद्धतीने हात लावण्यास सुरुवात केली. महिलेला त्याच्या घरी असहाय्य स्थितीत पाहून, तिने घरातून पळ काढला आणि खार पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलिसांनी लगेच शरद कपूर विरोधात गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी म्हटले आहे की, लवकरच शरद कपूरला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवले जाईल. या प्रकरणावर अधिक तपास सुरू आहे.