अजित पवार यांनी अरविंद सावंत यांच्या शायना एन सी य
अरविंद सावंतांवर भडकले अजित दादा ?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरविंद सावंत यांच्या शायना एन सी यांच्याबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “महिलांबाबत अशा अपमानास्पद वक्तव्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीत स्थान नाही. आपल्या राज्यात महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची परंपरा आहे.” अजितदादांनी उद्धव सेना गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जबाबदारीने बोलणे आवश्यक असल्याचेही सांगितले. "आपल्या लाडक्या बहिणींना सन्मान देणाऱ्या या भूमीत महिलांबाबत अशा शब्दांचा वापर निंदनीय आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.