बारामतीत अजित पवार आघाडीवर
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुक 2024 जाहीर झाल्यापासून बारामती विधानसभा चर्चेत राहिला आहे. बारामतीत पवार कुटुंबातील लढत पाहायला मिळत आहे. अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे. अजित पवार 27 हजारांहून अधिक मतांनी मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून युगेंद्र पवार यांच्या लढत पाहायला मिळत आहेत. सातव्या फेरीत अजित पवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. बारामतीत गुलाल कुणाचा ? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.
राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करून अजित पवारांनी महायुतीत सत्ता स्थापन केल्यानंतर ही निवडणूक बारामतीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. आता विधानसभेचा निकाल कोणाच्या बाजूने असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र सध्या अजित पवार आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.