मनसेकडून माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे उम

अमित ठाकरे माहिममधून उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई : मनसेकडून माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आहे. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यानंतर शक्तिप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरतेवेळी अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतील.

मुलासाठी आई प्रचाराच्या मैदानात...

शर्मिला ठाकरें यांचा अमित ठाकरे यांच्यासाठी  घरोघरी प्रचार सुरू आहे. दादर माहिम विधानसभा मतदार संघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी त्यांची आई शर्मिला ठाकरे मैदानात उतरल्या आहेत. ठाकरे घराण्यातील आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून अमित ठाकरे लढवत आहेत निवडणूक.

शिवसेना मनसेला पाठिंबा देणार, केसरकरांनी दिले संकेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. मी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून आलेलो आहे. सदा सरवणकर हे आमचे प्रमुख आमदार असून कठोर लढा देऊन त्यांनी हा मतदारसंघ टिकवून ठेवला आहे. ते पाचव्यांदा आमदार आहेत, त्यांचा योग्य तो मान ठेवला जाईल; असे केसरकर म्हणाले.