"लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार,"
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरीत शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचार सभेत विविध घोषणा आणि आश्वासने दिली. यावेळी बोलताना त्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, सरकारच्या योजनेच्या लाभ घेणाऱ्या कार्याला महत्व दिले.
शिंदे यांनी सांगितले, "लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार," आणि "लाडकी बहिण योजना बंद होणार नाही." "आमच्या सरकारने मुलींचं शिक्षण मोफत केलं आहे," असे त्यांनी सांगितले, शिक्षणात अजून काही सुधारणा करण्यावर भर असल्याचेही बोलेले. शिंदेंनी सामान्य नागरिकांच्या समस्यांबद्दल विचार व्यक्त करत म्हटले, "सर्वसामान्यांच्या वेदना आम्हाला समजतात." मुंबईच्या स्वच्छतेसाठी सरकारची कटिबद्धता दर्शवताना शिंदे म्हणाले, "मुंबईला प्रदूषण मुक्त करणार." त्यांनी आश्वासन दिले की, "लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचंय," यासाठी सरकार कटिबद्ध झाले आहे. "आम्ही आमच्या कालावधीत काम दाखवतो," असे म्हणत त्यांनी त्यांच्या सरकारच्या कार्यक्षमतेवर भर दिला. तसेच, शिंदे यांनी "दरवर्षी दोन लाख घरांचं काम पूर्ण करणार," असे सांगत गृहनिर्माण क्षेत्रात सरकारच्या उद्दिष्टांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणांनी प्रचार सभेतील शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.