छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी सात हजार ९९४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. एकूण ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ मतदान होईल आणि मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.