राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आ

आपटे, पाटीलला न्यायालयीन कोठडी

मालवण : राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्यशास्त्र सल्लागार चेतन पाटील या दोघांना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा उद्घाटनानंतर जेमतेम आठ महिन्यांतच पडला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी माफी मागितली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार पुतळा प्रकरणी  दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.