जगू तरी कसं ? शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न
धुळे : कधी अवकाळी तर कधी पिकांना भाव नाही अश्या अनेक त्रासाने शेतकरी नेहमीच चिंतेत असतो. आधीच अवकाळीने हवालदिल झालेला शेतकरी आता अधिकच चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु आता कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं समोर आलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उद्भवला आहे. कापसाला भाव वाढ नसल्याने शेतकरी अधिक चिंतेत आहे.
भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला मात्र तस काहीही न झाल्याने शेतकरी अधिकच त्रासाला आहे. धुळे जिल्ह्यात कापसाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र तरीदेखील कपाशीच्या भावामध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे आता जगू तरी कस? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवला आहे.
कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला चांगला भाव मिळाला होता परंतु यंदा मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली आहे.
2019 ते 2024 कापसाचा दर
वर्ष भाव 2019 5200 2020 5825 2021 10,000 2022 7500 2023 7050 2024 7100