सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिव

'...दूर राहण्यामुळेच किंमत कळते,' सायना-कश्यप पुन्हा एकत्र; नात्याला आणखी एक संधी देण्याची घोषणा

Saina Nehwal P. Kashyap Together Again : सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी, भारताची बॅडमिंटन जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही त्यांच्या नात्यातील गुंतागुंत दूर करण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात एकमेकांना दुसरी संधी देण्यासाठी यू-टर्न घेतला आहे. 2014 मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. या जोडप्याने 13 जुलैला अचानकपणे घटस्फोटाची घोषणा करत सर्वांना मोठा धक्का दिला होता.

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी आता घटस्फोटाच्या दिशेने पुढे जाण्याचे रद्द केले आहे. त्यांच्या विभक्त होण्याच्या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, आता तेव्हाची सोशल मीडिया पोस्ट सायनाने तिच्या अकाऊंटरून हटवली आहे.वैवाहिक जीवनापासून वेगळे होण्याचा निर्णय त्यांनी रद्द करत पुन्हा एकमेकांना आणि स्वतःलाही दुसरी संधी देण्याचे ठरवले आहे.

घटस्फोटावरून यू-टर्न शनिवारी, 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन कांस्यपदक विजेत्या नेहवालने इन्स्टाग्रामवर कश्यपसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "कधीकधी दूर राहणंच तुम्हाला उपस्थितीचे (समोर असलेल्याचे) मूल्य शिकवते. आम्ही इथे आहोत - पुन्हा प्रयत्न करत आहोत." गेल्या महिन्यात नेहवाल आणि कश्यप यांनी संयुक्त घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. कारण, दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. दोघेही वर्षानुवर्षे भारतीय बॅडमिंटनसाठी एक मजबूत आधारस्तंभ आहेत.

हेही वाचा - SAINA NEHWAL DIVORCE: तब्बल 7 वर्षानंतर घटस्फोट; नेमकं कारण काय? जाणून घ्या

इंस्टाग्रामवरील घोषणा नेहवाल यांनी गेल्या महिन्यात तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. बराच विचार केल्यानंतर, कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि योग्य वागणूक निवडत आहोत. आठवणींसाठी मी आभारी आहे आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या काळात आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद." पोस्ट आता हटवण्यात आली आहे

सायना नेहवालच्या सोशल मीडिया हँडलवरून ती पोस्ट हटवण्यात आली आहे. दोघांच्याही बॅडमिंटन कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर दोघेही देशासाठी खेळले आहेत. सायना नेहवालची कारकीर्द सायना नेहवाल ही भारतीय महिला बॅडमिंटनसाठी एक आदर्श खेळाडू आहे, 2012 मध्ये ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर तिच्या कारकिर्दीला गती मिळाली. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आणि BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. 2023 मध्ये सिंगापूर ओपनमध्ये पहिल्या फेरीत बाहेर पडल्यानंतर सायना परत कोणत्याही सामन्यात दिसली नाही.

पी. कश्यपची कारकीर्द कश्यपबद्दल सांगायचे तर, त्याच्या खेळादरम्यान, कश्यप जगातील टॉप 10 खेळाडूंमध्ये होता. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने जिंकलेले सुवर्णपदक. सध्या त्याने त्याच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे.

हेही वाचा - तुटलेल्या माहीची साक्षी बनली आधार; जाणून घ्या धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी