बँकिंग उद्योगाला करावा लागू शकतो मोठ्या समस्येचा सामना; आशियातील सर्वात श्रीमंत बँकरचा इशारा
आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी बँकिंग उद्योगाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे. वाढत्या ठेवी संकटाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उदय कोटक यांनी म्हटलं आहे की, 'बँकांसाठी हे एक मोठे आव्हान बनत आहे. बँकिंग उद्योगाला घटत्या नफ्याचा धोका आहे. स्वस्त किरकोळ ठेवींच्या मंद वाढीमुळे, बँका महागड्या घाऊक ठेवींचा अवलंब करत आहेत आणि नकारात्मक मार्जिनवर कर्ज देत आहेत. जर ठेवींची कमतरता अशीच राहिली तर बँकिंग व्यवसाय मॉडेल धोक्यात येईल.'
बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा ट्रेंड कमी झाला -
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून लोकांमध्ये बचतीची सवय कमी होताना दिसत आहे. गुंतवणुकीच्या नवीन साधनांच्या आगमनाने बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा ट्रेंड कमी होत आहे. पूर्वी लोक त्यांच्या बचत खात्यात आणि एफडीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवत असत. आता, हा ट्रेंड कमी झाला आहे. यामुळे बँकांमधील किरकोळ ठेवींची वाढ कमी होत आहे. अशा परिस्थितीत कर्ज देण्यासाठी बँकांना घाऊक ठेवी घ्याव्या लागतात, ज्यावर जास्त व्याज द्यावे लागते. यामुळे बँकांचे नफा कमी होत आहेत.
हेही वाचा - मुंबईत झाली सर्वात महागडी Real Estate Deal; कोण आहे या ''प्रॉपर्टी डील''चा खरेदीदार? जाणून घ्या
उदय कोटक यांनी म्हटलं आहे की, घाऊक ठेवींवर 8% व्यतिरिक्त इतर खर्च आहेत. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआर प्रमाणे, सीआरआर म्हणजे बँकांना त्यांच्या ठेवींचा काही भाग आरबीआयकडे ठेवावा लागतो, ज्यावर त्यांना कोणतेही व्याज मिळत नाही. याशिवाय, वैधानिक तरलता प्रमाण म्हणजेच SLR सारखे खर्च देखील आहेत. एसएलआर म्हणजे बँकांना त्यांच्या ठेवींचा काही भाग सरकारी बाँडमध्ये गुंतवावा लागतो.
रेपो रेट कमी होण्याची अपेक्षा -
बँकिंग व्यवस्थेत किरकोळ ठेवींमध्ये मंद गतीने वाढ होत आहे. दुसरीकडे, रेपो दर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे खर्च आणि कर्जाचे दर दोन्ही व्यवस्थापित करणे हे एक मोठे आव्हान असेल, असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे.