केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपाचा

लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठांच्या भत्त्यात वाढ करणार

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याचे नाव संकल्प पत्र आहे. या जाहीरनाम्यात भरघोस अशा तरतूदी करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात सध्या लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून चालु झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. पण आता या रकमेत वाढ होणार आहे. भाजपाच्या संकल्प पत्रातून त्यांनी लाडक्या बहीणींना दरमहा २१०० रूपये देणार असल्याचे सांगितले आहे. 

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सध्या दरमहा १५०० रूपये पेन्शन मिळते. त्यात वाढ होणार आहे. या रकमेत वाढ करून २१०० रूपये करण्यात येणार आहे. असे भाजपाच्या रविवारी प्रसिद्धी झालेल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या संकल्प पत्रात राज्यातील लाडक्या बहीणींना म्हणजेच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपासह त्यांच्या घटक पक्षाकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक वाढ होणार असल्याचे म्हणता येईल.