बीड पुन्हा हादरलं! माजलगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या
बीड: गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्याची ओळख गुन्हेगारी घटनांसाठी होतं आहे. आता पुन्हा एकदा बीड शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात मंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पदाधिकाऱ्याच्या निर्घृण हत्या करण्यात आली. रक्ताने माखलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किट्टिआडगाव येथील भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 35) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने थेट पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले.
माजलगावात कुऱ्हाडीने वार करून भाजप पदाधिकाऱ्यांची हत्या -
प्राप्त माहितीनुसार, माजलगाव शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसराजवळील बायपास रस्त्यावर, नारायण शंकर फापाळ नावाचा व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन बाबासाहेब प्रभाकर आगे यांचा पाठलाग करत होता. प्रभाकर आपला जीव वाचवण्यासाठी माजलगाव बसस्थानकाजवळील शाहुनगरकडे पळाला, परंतु नारायण फापाळने त्याला स्वामी समर्थ केंद्राजवळील रस्त्यावर पकडले आणि काही क्षणातच त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
हेही वाचा - पुण्यातील 55 वर्षीय उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीने प्रथम बाबासाहेब आगे यांच्या पोटावर हल्ला केला आणि नंतर डोक्यावर दोनदा हल्ला केला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा तयार केल्यानंतर, पोलिसांनी बाबासाहेब आगे यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - नागपुरात 28 वर्षीय तरुण उद्योजकावर चौघांकडून गोळीबार
आरोपीचे आत्मसमर्पण -
दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी नारायण शंकर फापलने स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि आत्मसमर्पण केले. त्याने प्रभाकरला का मारले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक हत्येच्या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे.