ITR फाइल करण्यास उरले फक्त तीन दिवस ; अन्यथा भरावा लागेल दंड
आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख हळूहळू जवळ येत आहे. ती आधी 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. म्हणजेच आता रिटर्न दाखल करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही तुमचा आयकर रिटर्न (ITR) निर्धारित वेळेत दाखल करू शकला नाही तर काय होईल? याबद्दल संपूर्ण माहिती देऊ.
15 सप्टेंबरनंतरही आयटीआर सादर न करणाऱ्यांना आयकर कायदा 1961 चे कलम 234 एफ लागू होते. याअंतर्गत, आयकर विभाग उशिरा आयटीआर दाखल करणाऱ्या करदात्यांना दंड आकारतो. या कलमाअंतर्गत, विभागाकडून दंड वसूल केला जातो. करदात्याच्या उत्पन्नानुसार दंड आकारला जातो. कलम 234 अ अंतर्गत, देय तारखेपूर्वी रिटर्न भरण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी थकबाकी असलेल्या कर रकमेवर 1% दराने व्याज देखील आकारले जाते. याचा अर्थ दंडाव्यतिरिक्त, व्याज देखील वेगळे भरावे लागेल.
परतावा मिळण्यास विलंब
अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरल्याने परतावा प्रक्रियेलाही विलंब होतो. अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर भरणाऱ्यांच्या तुलनेत अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरणाऱ्यांना परतावा मिळण्यास विलंब होतो.
किती दंड भरावा लागेल ? जर तुमचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल.
जर एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागणार नाही.
जर उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर कोणताही दंड आकारला जाणार नाही.