नवीन नियम लागू झाल्यानंतर, वाहनमालकांनी आपल्या गाड

20 Years Old Vehicles Rule : जुन्या गाड्यांचे टेन्शन आता संपले! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पण..

नवी दिल्ली : जर तुमची गाडी 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी झाली असेल आणि ती स्क्रॅपमध्ये काढण्याची चिंता तुम्हाला सतावत असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने 20 वर्षे जुनी कार आणि मोटरसायकल रस्त्यावर चालवण्याची परवानगी दिली आहे; पण यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे जुनी वाहने वापरणाऱ्या लाखो वाहनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

20 वर्षांनंतर काय करावे लागेल? केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार, वाहन जुने झाल्यावर काही गोष्टी अनिवार्य असतील. नोंदणीचे नूतनीकरण : 20 वर्षांचा टप्पा पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल. यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागेल. अनिवार्य 'फिटनेस टेस्ट': नूतनीकरण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीची 'फिटनेस टेस्ट'. या तपासणीत गाडीचे इंजिन, ब्रेक, लाईट, टायर यांची कार्यक्षमता तपासली जाईल. तसेच, गाडीचे प्रदूषण उत्सर्जन (PUC) ठरावीक निकषांमध्ये आहे का, हे काटेकोरपणे पाहिले जाईल. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यासच गाडी रस्त्यावर चालवता येईल.

हेही वाचा - Bima Sugam Website: RDAI ने लाँच केले बिमा सुगम पोर्टल; कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम वाढत्या प्रदूषणामुळे जुनी वाहने हा शहरी भागातील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे, त्यामुळे शहरी भागातील वाहनचालकांना अधिक दबाव जाणवणार आहे. शहरांसाठी कडक नियम : शहरांमध्ये वाहनांच्या नूतनीकरणासाठी शुल्क जास्त असेल. तसेच, व्यावसायक गाड्यांसाठी नियम अधिक कडक असतील. ग्रामीण भागाला दिलासा: ग्रामीण भागातील लोकांसाठी सरकारने थोडीशी शिथिलता दिली आहे. शेती आणि दैनंदिन वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना या नियमांमध्ये थोडी सूट मिळेल. तसेच, त्यांच्यासाठी नूतनीकरण शुल्कातही काही प्रमाणात दिलासा देण्याची तयारी आहे.

या नियमांचा उद्देश काय आहे? सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश दुहेरी आहे. एकीकडे प्रदूषण नियंत्रणात आणणे आणि दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे. वाहन जुने झाल्यावर अपघाताचा धोका आणि दुरुस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे नियमित तपासण्या करून गाडी योग्य स्थितीत आहे, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

नवीन नियम लागू झाल्यानंतर, वाहनमालकांनी आपल्या गाडीची नोंदणी वेळेत नूतनीकरण करणे आणि आवश्यक ती शुल्के भरणे बंधनकारक असेल. वेळेत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. लवकरच सरकारकडून या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - PM Narendra Modi Education: पंतप्रधान मोदींचे शिक्षण किती?, शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यांच्याकडे किती पदव्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

वीस वर्षे जुने वाहन नोंदणी शुल्क अवैध वाहनांसाठी नोंदणी शुल्क : 100 रुपये. मोटर सायकल : 2 हजार रुपये तीन चाकी किंवा 4 चाकी : 5 हजार रुपये हलक्या मोटर वाहनांसाठी : 10 हजार रुपये आयात केलेल्या दुचाकींसाठी : 20 हजार रुपये आयात केलेल्या चार चाकी वाहनांसाठी : 80 हजार रुपये इतर श्रेणीतील वाहनांसाठी : 12 हजार रुपये