ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

ढगाळ वातावरणामुळे रस शोषक किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात वर्तवलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस देखील झाला आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करावा. यासोबतच कापसाची साठवणूक करताना सावलीत कापूस वाळवून घ्यावा आणि त्यानंतर साठवावा. ओलिताखालील गव्हाची पेरणी बाकी असेल तर लवकरात लवकर आटपून घ्यावी असा कृषी सल्ला बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.