कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एक

शिंदेंच्या विरोधात केदार दिघेंना संधी

मुंबई : ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघातून उद्धव सेनेकडून केदार दिघे हे उमेदवार असतील. केदार दिघे हे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. यामुळे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत होणार आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा या राजकीय संघर्षात कोण जिंकणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

याआधी मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीद्वारे शिवसेनेने ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 

शिंदे शिवसेनेचे ४५ उमेदवार जाहीर नऊ मंत्र्यांना पुन्हा संधी मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार मुंबईतील सहा आमदारांना पुन्हा संधी दिली

संजय गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाव