‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रे
'काँग्रेसने जातीजातींत भांडणे लावली'
कोल्हापूर : ‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रेस वापर करीत आहे. जातीजातींत भांडणे लावत आहे. देव, देश आणि धर्म याबाबत आस्था नसणाऱ्या आणि नीती, निर्णयक्षमता नसणाऱ्या, देशाला धोका देणाऱ्या या पक्षावर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन करताना ‘राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला बळ द्या,’ असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
मूळ विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचा आरोप करताना योगी म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारला पुन्हा बहुमताने निवडून द्या. म्हणजे गणेशोत्सव, रामनवमी अशा वेळी दगडफेक करणारे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत.’