रितिकाने  'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण कर

ते फक्त भटके कुत्रे नाहीत.. हृदयाचे ठोके आहेत ! रोहित शर्माची पत्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराज

Ritika Sajdeh’s Instagram Story on Stray Dogs - भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सामना करणाऱ्या दिल्लीबाबत सर्वोच्च न्यायालयाने काल एक मोठा आदेश दिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की,'सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडून 'डॉग शेल्टर'मध्ये हलवावे. त्यांना परत सोडले जाऊ नये.' कुत्र्यांच्या चाव्यांचे वाढते प्रमाण आणि रेबीज रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरून अनेकांनी टीकात्मक भूमिका घेतली आहे. आता रोहित शर्माच्या पत्नीने म्हणजेच रितिका सजगदेहने देखील नाराजी व्यक्त केली. (Ritika Sajdeh’s Emotional Instagram Story on Stray Dogs Relocation Order in Delhi)

भटके कुत्रे हे केवळ रस्त्यावर फिरणारे प्राणी नाहीत तर ते शहराचे हृदयाचे ठोके आहेत. ते चहाच्या दुकानांवर बिस्किटांची वाट पाहणारे, दुकानदारांसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून काम करणारे, शाळेतून परतणाऱ्या मुलांना पाहून आनंदाने शेपूट हलवणारे आणि त्यांच्या उपस्थितीने वातावरण आत्मीयतेने भरणारे आहेत, असं रितिकाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेहने नाराजी व्यक्त केली आहे. 

सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय का घेतला? दिल्लीतील रोहिणीजवळील पूथ कलान येथे एका भटक्या कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजमुळे 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या समस्येची स्वतःहून दखल घेतली. राजधानीत कुत्रे चावण्याच्या घटनांची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी यांना कुत्र्यांसाठी 'निवारागृहे' बांधण्याचे निर्देश दिले.

न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, नवजात आणि लहान मुले कोणत्याही परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचे बळी होऊ नयेत. परिस्थिती खूप गंभीर आहे आणि त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

Ritika Sajdeh Emotional Instagram story About Stray Dogs "तुम्ही त्याला धोका म्हणतात, आम्ही त्याला हृदयाचा ठोका म्हणतो. आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक मोकाट कुत्र्याला रस्त्यावरून उचलून तुरुंगात टाकायला सांगते. जिथे सूर्यप्रकाश नाही. स्वातंत्र्य नाही. दररोज सकाळी त्यांना भेटणारे ओळखीचे चेहरे नाहीत,''अशी रितिकाने सुरुवात केली. .ती पुढे लिहिते की, 'पण हे फक्त "मोकाट कुत्रे" नाहीत. हे ते आहेत जे तुमच्या चहाच्या दुकानाबाहेर बिस्किटासाठी वाट बघतात, दुकानदारांसाठी रात्रीचे शांत पहारेकरी आहेत, मुले शाळेतून परतल्यावर शेपटी हलवणारे, हे एका थंड, निर्दयी शहरातली ऊब आहेत.'  

.'काही समस्या नक्की आहेत. त्यांचे चावणे, सुरक्षिततेची चिंता... पण, प्राण्यांच्या संपूर्ण समूहाला पिंजऱ्यात ठेवणे हा उपाय नाही, तो एक प्रकारचा नाश आहे. मोठ्या प्रमाणावर नसबंदी कार्यक्रम, नियमित लसीकरण मोहीम, सामुदायिक खाद्य क्षेत्र आणि दत्तक मोहीम, हा खरा उपाय आहे. असे केल्यास, शिक्षा नाही. तुरुंगवास नाही. जो समाज आपल्या निःशब्द लोकांचे संरक्षण करू शकत नाही, तो समाज आपला आत्मा गमावून बसतो. आज कुत्रे आहेत. उद्या... कोण असेल? तुमचा आवाज उठवा. कारण त्यांना आवाज नाही,'असे आवाहन तिने केले आहे..

रितिकाच्या पोस्टवरही टीका रितिकाच्या पोस्टवरही काही लोक टीका करत आहेत. लहान मुलांचे बळी गेले, तेव्हा ही कुठे होती? भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुले लहान मुले आणि माणसे रेबीजच्या तडाख्यात सापडली आणि त्यांनी जीव गमावला, तेव्हा तिने काहीच म्हटलं नाही, अशी टीका रितिकावर होत आहे.

याआधी राफा (Rafah) येथे इस्रायलने हल्ला केल्यानंतर तिने ALL EYES ON RAFAH अशी पोस्ट करत निषेध व्यक्त केला होता. तेव्हाही तिच्यावर टीका झाली होती आणि आताही त्यावेळच्या पोस्टवरून पुन्हा टीका होऊ लागली आहे. रितिकाने राफासाठी आवाज उठवला. मात्र, बांगलादेशी हिंदूंसाठी काहीही बोलावसं तिला वाटलं नाही, अशी टीका लोक करत आहेत. हे लोक (रितिका आणि तिच्यासारखे इतर सेलिब्रिटी) कोणावर बोलायचं आणि कोणावर नाही बोलायचं, याविषयी अशी निवड कसे काय करू शकतात, असा सवाल काही लोकांनी उपस्थित केला आहे.