विठोबाच्या मंदिरात भाविकाची फसवणूक झाल्याची घटना घ

विठोबाच्या मंदिरात भाविकाची फसवणूक; पालघरमधील भाविकाची फसवणूक

पंढरपूर : पंढरपूरमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. विठ्ठलाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. असच पालघर जिल्ह्यातील एक कुटुंब पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यावेळी विठोबाच्या मंदिरात भाविकाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिरात भाविकाची फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव मुकुंद उत्पात असे आहे. दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

नेमकं घडलं काय?

पालघर जिल्ह्यातील वसई येथील कुणाल दीपक घरत या भाविकाकडून 11 हजार रुपये घेतले. चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात असे त्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. विठ्ठलाच्या मंदिरात पुजारी असल्याचे सांगून मुकुंद यांनी 11 हजार रूपयांची रक्कम स्वीकारली. समितीच्या कार्याला जाऊन भाविकाच्या नावे 5001/-  रुपयांची देणगी पावती केली. विठ्ठल मंदिरात प्रवेश करत असताना पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आले. उत्पात याच्यावर शहर पोलीस ठाण्यात 318 (3) (4 )अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन संपूर्णतः निशुल्क आहे. भाविक भक्तांनी पदस्पर्श दर्शनासाठी कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.