उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीड

‘बाज की असली उड़ान बाकी है...’ फडणवीसांच्या पोस्टने चर्चांणा उधाण

मुंबई :  महाराष्ट्रात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महायुतीने घवघवीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात भाजपा 132, शिवसेना 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजयी झाली. महायुतीत सर्वाधिक जागांवर भाजपा निवडून आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असेल अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.

नुकतच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केली. आहे. या पोस्टमध्ये त्यांनीबाज की असली उड़ान बाकी है...असे म्हटले आहे. फडणवीसांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरवर खूप बोलले जात होते. जरांगे फॅक्टरचा मतांवर परिणाम होईल असंही म्हटलं जात होतं. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचा महायुतीवर काही परिणाम न झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. भविष्यात जरांगे फॅक्टर पुन्हा डोकं वर काढू नये. म्हणून भाजपा महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

महाराष्ट्रात भाजपाकडून फडणवीस सोडून दुसरा मराठा मुख्यमंत्री केला तर देवेंद्र फडणवीसांकडे दुसरी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा याचा कार्यकाळ संपला होता. परंतु निवडणुकांमुळे त्यांचा कार्यकाळा वाढवला गेला. त्यामुळे जे.पी.नड्डा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. नड्डा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा फडणवीसांना अध्यक्ष करून केंद्रात काम करण्याची संधी देतील. त्यामुळे फडणवीसांना केलेली ही पोस्ट त्यांचा संकेत असल्याची चर्चा मानली जात आहे. परंतु यावर अद्याप भाजपाकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.