लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली आहे. महा

'महायुतीच्या विजयाचा २३ नोव्हेंबरला जल्लोष करुया'

मुंबई : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. मतदारांनी भाजपाच्या नेतृत्वातील युतीला २०१४ आणि २०१९ मध्ये भरभरुन यश दिले. बहुमत मिळवून दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करुया. या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय... असे ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.