कार्तिकी यात्रेनिमित्त देहू आळंदीमध्ये लाखोंच्या स

कार्तिकी यात्रेनिमित्त देहू आळंदीमध्ये भाविकांची गर्दी

पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त देहू आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त दाखल होत आहेत. यानिमित्त देहू आळंदी सज्ज झाली आहे. देहू मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुंदर अशा रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात निकिता मोरे या युवतीने आकर्षक अशी रांगोळी काढली आहे. या रांगोळीला दोन ते तीन तासांचा अवधी लागला असून 15 किलो रांगोळीचा विविध रंगात वापर करण्यात आला आहे ही रांगोळी पाहण्यासाठी देहूतील भाविकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. रांगोळी आलेल्या भाविकांचे आकर्षण होत असल्याचे दिसून आले आलेले भाविक या सुंदर रांगोळीचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना पाहायला मिळत आहे.