EPFO Rules on Interest: नोकरी सोडल्यानंतर PF वर व्याज मिळते का? काय आहे EPFO चा नियम? जाणून घ्या
EPFO Rules on Interest: नोकरी गमावणे हा प्रत्येकासाठी कठीण काळ असतो. अशा वेळी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो की पीएफमध्ये जमा केलेल्या बचतीवर व्याज मिळत राहील का? तथापी, ईपीएफओने स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यात जमा रकमेवर व्याज मिळत राहील.
PF वर व्याज कधीपर्यंत मिळेल?
ईपीएफओच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडली किंवा नोकरी गमावली, तरी त्याच्या पीएफ खात्यात जमा रकमेवर व्याज मिळत राहते. हे व्याज सदस्याच्या 58 व्या वर्षापर्यंत लागू असते. याचा अर्थ असा की तुमचे पैसे निष्क्रिय राहणार नाहीत, तर कालांतराने वाढत राहतील.
तथापि, 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जर खात्यात पैसे राहिले असतील, तर व्याज थांबते. या वयानंतर सरकार गृहीत धरते की व्यक्ती निवृत्त झाली आहे आणि त्याने आपले पैसे काढणे आवश्यक आहे.
तुमचा PF बॅलन्स कसा तपासायचा?
तुम्ही तुमचा पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) बॅलन्स अगदी सहजपणे तपासू शकता: मिस्ड कॉल/एसएमएस: नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल देणे किंवा 7738299899 वर EPFOHO UAN ENG असा एसएमएस पाठवणे. वेबसाईट: EPFO सदस्य पासबुक वेबसाइट वर UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून बॅलन्स तपासणे. मोबाइल अॅप: स्मार्टफोन वापरकर्ते UMANG अॅप डाउनलोड करून EPFO विभागातून आपले पीएफ पासबुक आणि क्लेम स्टेटस तपासू शकतात.