महाराष्ट्रात दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्

तुम्हाला माहितीय का? सोन्याचा भाव कितीने कमी झाला

महाराष्ट्रात दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात सोन्याच्या दागिन्यांची महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. सद्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झालीय. या आठवड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज सोनं स्वस्त झालं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात.  

काय आहे सोन्याचा भाव?  22 कॅरेट सोन्याचा भाव काय? 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 7,085 रुपयांना विकलं जात आहे. 22  कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 56,680 रुपयांवर आहे. 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,850 रुपये इतका आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,08,500 रुपये इतका आहे

24 कॅरेट सोन्याचा भाव किती? 24  कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,72,800 रुपये किंमतीने विकलं जातंय. 10  ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,280 रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,824 रुपये इतका आहे. 1 ग्रॅम सोनं 7,728 रुपयांनी विकलं जात आहे.