जगाच्या प्रत्येक भागात बांधलेल्या विहिरी सहसा गोल

जगातील बहुतेक विहिरी सहसा गोल का आहेत, काय आहे यामागील रहस्य आणि वैज्ञानिक कारण?

why wells are in round shape : तुम्ही कधी ना कधी आपापल्या गावी गेला असाल आणि तिथे विहीर पाहिली असेल. तुम्हीही विहिरीतून पाणी काढले असेल. नसेलच तर, निदान कुठल्या ना कुठल्या चित्रपटात तरी तुम्ही विहीर पाहिली असेलच. पण विहिरीचा आकार गोल का असतो, याचा कधी विचार केला आहे का?",

विहिरी गोल आकारात का असतात प्राचीन काळापासून पाण्याला जीवन मानले गेले आहे. त्या काळात घरासाठी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी विहीर हा एकमेव स्रोत होता. मात्र, बदलत्या काळानुसार, त्यांची जागा प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांनी घेतली आहे. तुम्हाला माहिती आहे का की, जगाच्या प्रत्येक भागात बांधलेल्या विहिरी सहसा गोल आकाराच्या असतात? त्याच्या गोलाकार असण्यामागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना यामागील कारणही माहीत नाही. चला, याबदद्ल जाणून घेऊ.

हेहूूी वाचा - Eat A Tomato Everyday: दररोज रिकाम्या पोटी टोमॅटो खा.. मधुमेहासह या 3 समस्या होतील गायब

विहीर बनवण्यासाठी खूप माती खोदली जाते हे आपल्याला माहीत आहे. यासोबतच, विहिरी बनवण्यासाठी खोदकामाचाही वापर केला जात असे. असे खोदकाम करताना इतर कोणत्या आकारापेक्षा गोल आकाराची विहीर बनवणे सोपे आहे. यासोबतच, विहिरीचे आकार गोल असण्याचे आणखी एक कारण म्हणजे चौकोनी किंवा त्रिकोणी विहिरीच्या तुलनेत तिला आकार देणे सोपे आहे.

'हे' आहे वैज्ञानिक कारण  याशिवाय, विहीर गोल असण्यामागे कारण असे आहे की, जर विहीर गोल नसून चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी षट्कोनी असेल तर, पाण्याचा सर्व दाब फक्त त्याच्या कोपऱ्यांवर असेल. ज्यामुळे विहीर आणि तिच्या भिंती जास्त काळ टिकणार नाहीत. यामुळे विहीर बुजून जाईल आणि जास्त काळ टिकू शकणार नाही.

विहिरीत पाणी असते, त्यामुळे विहिरीचे जितके कोपरे असतील त्या कोपऱ्यांवर पाण्याचा दाब जास्त पडतो. हा पाण्याचा दाब खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे विहीरीच्या कोपऱ्यांवर जास्त दबाव पडून लवकरच भेगा पडू लागतील आणि झीज होईल. तर गोलाकार विहिरींमध्ये ही समस्या उद्भवत नाही. यामध्ये गोलाकार आकारामुळे विहिरीच्या भिंतीवर पाण्याचा दाब सारखाच राहतो. अशा प्रकारे या विहिरी शतकानुशतके शाबूत राहतात. म्हणूनच जगात सर्वत्र दिसणाऱ्या विहिरी चौकोनी किंवा त्रिकोणी नसून गोलाकार असतात. विहीर गोलाकार असल्याने, पाण्याचा दाब सर्व बाजूंनी समान राहतो आणि या विहीरी जास्त काळ मजबूत राहतात.

बहुतेक भांडीही गोल असतात.. आपल्या स्वयंपाकघरातील बहुतेक भांडी देखील गोल असतात. ग्लास, ताट, वाटी, बादली किंवा थाळी पाहिली तर ती सगळी गोल असतात. भांड्यावरील पृष्ठभागावरील दाबाचा नियम लक्षात घेऊन त्यांना गोलाकार बनवले जाते. गोल भांड्यांचे आयुष्य जास्त असते. दाबाचा नियम लक्षात घेऊन पात्राचे किंवा भांड्यांचे पृष्ठभाग गोल केले जातात.

चौकोनी आकाराच्या विहिरी तुम्ही पाहिल्या असतील, पण त्या फारशा भक्कम नसतात. त्यांचे आयुष्य तुलनेने कमी असते. गोल विहिरी जास्त काळ टिकतात. गोल विहिरीची माती फार काळ झिजत नाही. गोल विहिरीच्या आतील पृष्ठभागावरील दाब सर्व बाजूंनी सारखाच असतो. त्यामुळे गोल भांड्यांना दीर्घायुष्य असते.

हेहूूी वाचा - Hair Tips In Marathi : दुतोंडी केसांनी हैराण केलंय? घरच्या घरी करा हे सोपे उपाय