Trump-Putin To Meet In Alaska : 58 वर्षांपूर्वीची रशियाची चूक, अलास्का अमेरिकेला विकला; इथेच ट्रम्प-पुतिन भेटतील
Trump-Putin To Meet In Alaska : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) अशा परिस्थितीत भेटत आहेत की, सर्व जगाच्या नजरा त्यांच्यावर आहेत. ते ज्या ठिकाणी भेटणार आहेत, ते ठिकाण देखील खास आहे. जगातील दोन शक्तिशाली देश जिथे चर्चेसाठी एकत्र येऊन निर्णय घेणार आहेत, या जागेचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? खरं तर, हे ठिकाण आधी रशियाच्या मालकीचं होतं. आता ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. असं कसं झालं, अलास्का अमेरिकेकडे कसं गेलं? चला, जाणून घेऊ..
अलास्काच्या अँकरेजमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होत आहे. या बैठकीचे आयोजन शेवटच्या क्षणी ठरले, ज्यामुळे आयोजकांना जागा निवडण्यात अडचण आली. प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आहे की हे ठिकाण का निवडले गेले?
ऑगस्ट महिन्यात अलास्का पर्यटकांनी भरलेला असतो, ज्यामुळे मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणांची उपलब्धता कमी होती. यासोबतच सुरक्षा आणि कडक गोपनीयतेच्या आवश्यकतांमुळे पर्याय आणखी मर्यादित झाले. शेवटी, सर्व सुरक्षा निकष पूर्ण करणारे अमेरिकन सैन्याचे जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन (JBER) या भेटीसाठी निवडण्यात आले.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी या बैठकीचा प्रस्ताव मांडला होता, जो ट्रम्प यांनी स्वीकारला. जेणेकरून, पुतिन काय विचार करत आहेत, हे त्यांना समजेल. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. परंतु, ट्रम्प त्यांच्याशी आणि युरोपीय नेत्यांशी फोनवर बोलतील.
हेही वाचा - अमेरिका-चीन संघर्ष... पंतप्रधान मोदींचा आजच्या बैठकीत हा निर्णय, चिप मार्केटबाबत एक मोठे पाऊल!
अलास्काचा इतिहास (Alaska History)
अलास्काची निवड केवळ तेथील सुविधांमुळेच नाही तर, इतिहास आणि प्रतीकात्मकतेमुळे देखील विशेष आहे. ते एकेकाळी रशियाचा एक भाग होते, जे 1967 मध्ये ते अमेरिकेने विकत घेतले होते. आता ते पूर्व आणि पश्चिमेचे भेटीचे ठिकाण बनले आहे. हे ठिकाण एक खास जमीन विकण्याच्या रशियाच्या कराराशी संबंधित आहे, जो अमेरिकेसाठी फायदेशीर करार ठरला. तर, रशियाला तात्पुरता फायद्याचा आणि भविष्यातील मोठ्या काळासाठी तोट्याचा ठरला.
या अमेरिकन राज्याचा इतिहास खूप वेगळा आहे. दोन शतकांपूर्वीपर्यंत रशियाचे या जागेवर नियंत्रण होते. परंतु अलास्का स्वतःकडे ठेवणे रशियाला महाग पडत होते. म्हणून रशियाने हे ठिकाण केवळ 63 कोटी रुपयांना ही जमीन अमेरिकेला विकली.
रशियाने 18 व्या शतकात अलास्कामध्ये आपली वसाहत बनवली होती. 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत अलास्कावर रशियाचे नियंत्रण होते. परंतु, अलास्का स्वतःकडे ठेवणे रशियाला महाग पडत होते. तेथील विषम हवामान, संसाधनांचा अभाव आणि प्रशासकीय अडचणींमुळे रशियाला हे ठिकाण विकण्यास भाग पडले होते.
हेही वाचा - ट्रम्पना धक्का? एकीकडे अमेरिकेच्या टॅरिफ धमक्या सुरूच; भारत या श्रीमंत देशासोबत करणार 10 मोठे करार
रशियाचे आर्थिक संकट (Russia Financial Crisis After Crimeaon War)
त्यावेळी क्रिमियन युद्धानंतर (1853-1856) रशिया आर्थिक संकटाचा सामना करत होता. अमेरिकेने 1867 मध्ये एका ऐतिहासिक करारानुसार रशियाकडून अलास्का विकत घेतला (Russia sold Alaska). याला 'सेवर्ड्स फॉली' (Seward’s Folly) म्हणून ओळखले जाते. (Seward’s Folly म्हणजे सेवर्ड्स यांचा मूर्खपणा) तत्कालीन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री विल्यम एच. सेवर्ड (William H. Seward) यांनी रशियाशी वाटाघाटी सुरू केल्या. तेव्हा रशियाने त्यांना अलास्का 7.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याची ऑफर दिली. अमेरिकन लोकांना ती ओसाड आणि निरुपयोगी जमीन वाटत होती. परंतु सेवर्ड यांना विश्वास होता की अलास्का भविष्यात धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आता ही जमीन अमेरिकेसाठी खरेदी करणे हा सेवर्डस् यांचा मूर्खपणा नव्हता; तर, तो निर्णय रशियासाठी चुकीचा ठरला.
काळाने सिद्ध केले की, हा करार अमेरिकेसाठी अत्यंत फायदेशीर होता. नंतर अलास्कामध्ये सोने, तेल आणि इतर नैसर्गिक संसाधने सापडली. पर्यटन सुरू झाले. ज्यामुळे आता अलास्का आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे बनले. त्यावेळी हा करार वादग्रस्त होता, परंतु आज तो अमेरिकन इतिहासातील एक दूरदर्शी पाऊल मानला जातो.