माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांनी मुलाच्या प्रचारासा
माजी मंत्री प्रसाद तनपुरेंची कार्यकर्त्याला धमकी
नगर : नगर जिल्ह्यात कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांनी मुलाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे. प्राजक्त तनपुरेंचा प्रचार करा अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांनी दिली. माजी मंत्री तनपुरेंनी अण्णासाहेब बाचकर या कार्यकर्त्याला धमकी दिली आहे. मुलाच्या प्रचारासाठी दिलेल्या धमकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णासाहेब बाचकर पोलीस अधीक्षकांना भेटून संरक्षणाची मागणी करणार आहेत.
काय म्हणाले माजी मंत्री प्रसाद तनपुरे ?
प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ. तनपुरेंच्या विरोधात जाणं आता सोपे नाही. अशी दिली धमकी माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांनी एका कार्यकर्त्याला दिली. या धमकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.