विधानसभा निवडणुकीत पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या

भाजपातून बंडखोरांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या आणि बंड करुन निवडणूक लढवत असलेल्या अशा ४० जणांवर भाजपाने कारवाई केली. भारतीय जनता पार्टीने ४० बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.