शाळेत लागली अचानक आग; जवळपास 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू
देश : नायजेरियामधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नायजेरियाच्या एका शाळेमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीत होरपळून जवळपास 17 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अनेक विद्यार्थी जखमी असल्याचं देखील समोर आलाय. या संपूर्ण घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पालक देखील चिंतेत आहे.
हेही वाचा: विराट कोहली का खेळला नाही नागपूरमधला एकदिवसीय सामना ? कशी घडली घटना?
शाळेजवळ काही काठ्या ठेवण्यात आल्या होत्या. या काठ्यांमुळे शाळेला आग लागल्याचं बोललं जात असून या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. या शाळेला जेव्हा आग लागली तेव्हा 100 विद्यार्थी शाळेत असल्याचे वृत्त असून यापैकी जवळपास 17 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी जखमी झालेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली असून त्यांनी शाळेतील जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश देखील दिले आहेत.