Vanraj Andekar Murder Case: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड; आरोपीच्या मुलाची गोळ्या घालून हत्या; टोळीयुद्धामुळे पुण्यात घबराट
पुणे : ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका (Pune Crime) उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. ऐन गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या तोंडावर खुनाच्या घटनेने पुणे हादरलं आहे.वनराज आंदेकरच्या हत्येला पूर्ण झाले असताना खुनाचा बदला घेण्यात आला आहे. पुण्यात ऐन सणासुदीला टोळी युद्ध भडकले आहे. यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. नाना पेठेतील हमाल तालीमजवळ एका इमारतीच्या पार्किंगमध्ये गाेविंद याच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडण्यात आला. त्यात तो मृत्युमुखी पडला. गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर हा वनराज आंदेकरच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा म्हणजे सख्खा भाचा आहे. ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे.
हेही वाचा - Bomb Threat: '34 वाहनांमध्ये 400 किलो RDX...'; वाहतूक पोलिसांना धमकी, मुंबईत हाय अलर्ट जारी
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलंय. गेली पाच दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं
वर्चस्ववादातून गेल्यावर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. यानंतर एक वर्ष पूर्ण होत असताना या प्रकरणी आणखी एक मोठा गुन्हा घडला आहे. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिरुद्ध दूधभाते, वनराज आंदकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती.
आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट रचल्याचे नुकत्याच उघडकीस आले. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड आणि अनिरुद्ध दूधभाते रहायला आहेत. आंदेकर टोळीने गायकवाड आणि दूधभाते यांच्या निकटवर्तीयांवर पाळत ठेवली होती. भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेने कारवाई करून एकाला अटक केली होती. याप्रकरणी कृष्णा आंदेकर यांच्यासह आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऐन गणेशोत्सवात शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने घबराट उडाली आहे.
हेही वाचा - Udaipur Crime News : वर्णावरून पत्नीला सततचे टोमणे, अखेर घेतला जीव; पतीला सुनावली मृत्युदंडाची शिक्षा