महादेव शंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून गणपती

Ganesh Idol Ritual : गणेश चतुर्थीला स्थापन केलेली मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकतो का? शास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

Ganesh Idol Permanently At Home : महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो. गणपती ही देवता शांत मानली जाते. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. लहान मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवता येतात का? किंवा गणेश चतुर्थीला स्थापन केलेली छोटी मूर्ती आपण वर्षभर घरी ठेवू शकतो का? जाणून घेऊ, यामागील शास्त्र..

पूजन केलेली गणेशमूर्ती वर्षभर घरात न ठेवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे गणेशोत्सवाचा काळ हा “पार्थिव गणेशाचे व्रत” मानला जातो. गणेशोत्सवात स्थापन केलेली मूर्ती विशेषत: मातीची आणि विशिष्ट कालावधीसाठी प्राणप्रतिष्ठा केलेली असते आणि तिला अनंत चतुर्दशीला विसर्जित करणे हा धार्मिक विधीचा भाग आहे. गणपती बाप्पाला निरोप देऊन त्याचे विसर्जन केले जाते, ज्यामुळे हा उत्सव पूर्ण होतो. भगवान गणेशाची “विघ्नहर्ता” म्हणून पूजा केली जाते आणि विसर्जनाच्या माध्यमातून गणपती भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून आपल्या मूळ स्थानी परतत असल्याचा संदेश दिला जातो.

हेही वाचा - Ganesh Visarjan Muhurat 2025 : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी हा आहे शुभ काळ; जाणून घ्या मुहुर्त आणि पूजाविधी

यामागील कारणे: पार्थिव गणेशाचे व्रत: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जी गणपतीची मूर्ती घरी आणली जाते, ती मातीची किंवा पर्यावरणास अनुकूल घटकांपासून बनलेली असते. हे 'पार्थिव गणेशाचे व्रत' असल्याने, या व्रताचे अंतिम स्वरूप म्हणजे त्या मूर्तीचे विसर्जन करणे होय. 

धार्मिक परंपरा: गणेशाला उत्सवाच्या शेवटी निरोप देणे ही एक परंपरा आहे, जी अनंत चतुर्दशीला पार पाडली जाते. या दिवशी मूर्तीचे विधीवत पूजा करून विसर्जन केले जाते.

उत्सव साजरा करण्याची पद्धत: गणेशोत्सव हा विशिष्ट कालावधीसाठी (उदा. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस) साजरा केला जातो, त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. 

घरात कायमस्वरूपी मूर्ती ठेवण्याचे तोटे आणि फायदे गणेश चतुर्थीला स्थापना केलेली गणेशमूर्ती विशिष्ट कालावधीसाठी आणि विशेष उद्देशाने स्थापन केलेली असते. त्यानुसारच, प्राणप्रतिष्ठा करताना संकल्प केलेला असतो. यामुळे ठराविक कालावधीनंतर तिचे विसर्जन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास धार्मिक श्रद्धेनुसार दोष निर्माण होऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच, या मूर्तीची वर्षभरा काळजी घेणे कठीण होऊ शकते. ती जागेवरून हलवली जाणे किंवा घाई-गडबडीने काही करायला गेल्यास भंग होण्याची शक्यता असते. मात्र, जर मूर्ती केवळ सजावटीसाठी किंवा सामान्य पूजेसाठी ठेवली गेली असेल आणि ती विधिवत स्थापित किंवा विसर्जित केली नसेल तर ती धार्मिक दृष्टिकोनातून दोषपूर्ण मानली जात नाही. कायमसाठी ठेवलेली मूर्ती: जर घरात गणपतीची मूर्ती कायमस्वरूपी ठेवायची असेल तर धार्मिक पूजेसाठी नसलेली मूर्ती असावी. तिची रोज पूजा करण्याची आवश्यकता नसते आणि ती घरात कायमस्वरूपी ठेवता येते. अशी मूर्ती किंवा पूजेसाठीचीही मूर्ती धातूची असल्यास भंग होण्याची भीती राहत नाही. सर्व शक्यतांचा विचार करून त्यानुसारच, कायमस्वरूपी ठेवण्याची मूर्ती निवडावी. कायमस्वरूपी मूर्ती घरी ठेवली तरी तिची नियमितपणे पूजा करणे आणि तिची काळजी घेणे आवश्यक आहे

हेही वाचा - Anant Chaturdashi 2025 : अनंत सूत्र 14 गाठींचेच का बांधले जाते? जाणून घेऊ महत्त्व आणि पूजेचा शुभ काळ

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)