Gayatri Mantra : अशा प्रकारे गायत्री मंत्राचा जप करा; जीवनात खूप सकारात्मक बदल घडून येतील
Significance Gayatri Mantra In Human Life : मानवी जीवनात गायत्री मंत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायत्री मंत्र 'ओम भूर्भुवः स्व: तत्सावितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।' हा सर्वात प्रभावी मंत्रांपैकी एक मानला जातो. या मंत्राचा अर्थ असा आहे की 'आपण निर्मात्याच्या, तेजस्वी देवाच्या तेजाचे ध्यान करतो, देवाचे तेज आपल्या बुद्धीला योग्य मार्गावर चालण्यास प्रेरित करो.' ज्योतिषशास्त्रात, योग्य वेळी आणि नियमितपणे या मंत्राचा जप करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया….
गायत्री मंत्राचा जप करण्याची वेळ ज्योतिषशास्त्रात, गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी 3 वेळा सांगितल्या आहेत. यामध्ये, गायत्री मंत्राचा जप करण्याची पहिली वेळ सकाळी आहे. या मंत्राचा जप सूर्योदयापूर्वी थोडा आधी सुरू करावा. सूर्योदयानंतरपर्यंत जप करावा. मंत्रांचा जप करण्याची दुसरी वेळ दुपारची आहे. दुपारीही या मंत्राचा जप केला जातो. मंत्र जप करण्याची तिसरी वेळ संध्याकाळी असते, सूर्यास्ताच्या आधी काही वेळ. मंत्र जप सूर्यास्ताच्या आधी सुरू करावा आणि सूर्यास्तानंतर काही काळासाठी करावा.
हेही वाचा - Shravan 2025: शिवामूठ म्हणजे काय? जाणून घ्या, श्रावणात भगवान शिवाच्या या पूजनाचं महत्त्व काय..
मंत्र जप करताना या गोष्टी लक्षात ठेवा शास्त्रांनुसार, जर गायत्री मंत्र संध्याकाळ व्यतिरिक्त इतर वेळी जप करायचा असेल तर अशा परिस्थितीत मंत्र शांतपणे किंवा मानसिकरित्या जपावेत. लक्षात ठेवा की, या वेळी मोठ्या आवाजात मंत्र जप करू नये. याशिवाय, गायत्री मंत्र जप करताना नेहमीच रुद्राक्ष माळेचा वापर करावा. जप करायच्या मंत्रांची संख्या किमान 108 असावी. लक्षात ठेवा, की घराच्या मंदिरात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी गायत्री मातेचे ध्यान करताना हा मंत्रजप करावा.
उत्साह वाढतो ज्योतिषशास्त्रानुसार, गायत्री मंत्र जप करण्याचे मोठे महात्म्य सांगितले आहेत. जो कोणी गायत्री मंत्र जप करतो त्याच्या आयुष्यात उत्साह आणि सकारात्मकता वाढते. यामुळे तो सर्वात वाईट परिस्थितीतूनही बाहेर पडू शकतो. याशिवाय, व्यक्तीचे मन धर्म आणि सेवाकार्यातही गुंतू लागते.
व्यक्तीला विशेष शक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार, गायत्री मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला गायत्री माता आशीर्वाद देते. तिच्या आशीर्वादाने व्यक्तीला अनेकदा पूर्वसूचना मिळाल्याप्रमाणे अनुभव येऊ लागतात. परिस्थितीचा अंदाज घेण्याचे सामर्थ्य वाढते. यासोबतच, गायत्री मातेचे आशीर्वाद आणि शुभ स्पंदने ग्रहण करण्याची म्हणजेच, स्वीकारण्याची शक्तीदेखील वाढते. याशिवाय, बऱ्याच काळापर्यंत श्रद्धापूर्वक मनापासून गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे स्वप्नसिद्धीदेखील मिळते. असे मानले जाते की स्वप्ने त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या घटनांबद्दल माहिती देतात.
राग शांत होतो ज्योतिषशास्त्रानुसार, कोणी कितीही रागावला असला तरी, गायत्री मंत्राचा जप केल्याने त्याचा राग हळूहळू कमी होऊ लागतो. रागीट स्वभावाला शांतता आणि स्थैर्य मिळते. याशिवाय, या मंत्रामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासूनही आराम मिळतो. गायत्री मंत्राचा जप केल्याने रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे होते. यामुळे आजारांपासूनही आराम मिळतो आणि चेहऱ्यावर तेज येते. याशिवाय, दम्याच्या रुग्णांसाठीही याचा जप फायदेशीर आहे.
हेही वाचा - घड्याळ भेट देण्याचा विचार करताय? थांबा, आधी जाणून घ्या, याचा जीवनावर काय परिणाम होतो..
मन वाईट विचारांपासून दूर राहते ज्योतिषशास्त्रानुसार, गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या मनातील वाईट विचार कमी होऊ लागतात. मनावर नियंत्रण येते. अनाठायी भीती दूर होते. व्यक्तीचा नेहमी योग्य मार्गावर चालण्याकडे कल राहतो आणि त्याच्या मनात कधीही वाईट विचार येत नाहीत. असे लोक उत्साहाने इतरांना मदत करतात. माणूस धाडसी, शूर, धैर्यवान बनतो आणि असे लोक कोणाचाही त्रास, अन्याय सहन करत राहत नाहीत. त्यांच्यामध्ये अयोग्य गोष्टींना प्रत्युत्तर देण्याची धमक निर्माण होते. त्यांच्या चांगुलपणामुळेच त्यांना समाजात आदर मिळतो. गायत्री मंत्राच्या जपाचा गरातील प्राणी-पक्ष्यांवरही चांगला परिणाम होतो. (Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)