शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साहिल

सांगलीत भीषण अपघात! शिवशाही बसच्या धडकेत 22 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Sangli Accident प्रतिकात्मक प्रतिमा

सांगली: सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गावर फल्ले मंगल कार्यालयाजवळ बुधवारी सकाळी 8:15 वाजता एक भीषण अपघात घडला. शिवशाही बस (MH 09 EM 1479) आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साहिल अन्सारी मुलाणी (22) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (19) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. 

परीक्षेसाठी जाताना काळाचा घाला - 

प्राप्त माहितीनुसार, नागठाणे येथील रहिवासी साहिल आणि प्रतीक हे स्टेनोग्राफी परीक्षेसाठी सांगलीकडे दुचाकीवरून जात होते. विलिंग्डन महाविद्यालयात प्रतीकची परीक्षा होती. प्रतीककडे वैध परवाना नसल्यामुळे साहिलने त्याला इस्लामपूरहून दुचाकीवर आणले होते. टोल नाक्याजवळ पोहोचताच शिवशाही बसने बायपासमार्गे रस्ता ओलांडताना त्यांना जोरदार धडक दिली. 

हेही वाचा - नाशिकमध्ये कार आणि मोटारसायकलची भीषण धडक; 7 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

शिवशाही बसने धडक दिल्यानंतर दोघे रस्त्यावर फेकले गेले. साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात साहिलचा जागीच मृत्यू झाला. तसचे प्रतीकला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या प्रतीकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा दिल्लीत हिट अँड रनची घटना! दारूच्या नशेत ऑडी चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडले

साहिल हा इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.कॉम.चा विद्यार्थी होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. तथापी, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.