दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत? योग्य प्रमाण आणि फायदे जाणून घ्या
Almond Eating Benefits In marathi : तुम्हाला महिती आहे का? बदामला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. बदाम शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. खासकरून सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला अधिक फायदे होतात. पण गरजेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्यास दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळं दररोज किती प्रमाणात बदाम खावं, याबद्दल माहिती तुम्हाला आहे का? आम्ही तुम्हाला दररोज किती प्रमाणात बदाम खावं याबद्दल सांगणार आहोत...
स्नायू बळकट ठेवण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि मेंदूचे कार्य वाढवण्यासाठी दररोज ५-६ भिजवलेले बदाम खाणे पुरेसे मानलं जातं. काही विशिष्ट आरोग्य समस्यांसाठीही बदाम उपयुक्त ठरतात. आता बदाम खाण्याचे काय फायदे आहे. त्याचा आढावा आपण घेऊयात.
जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर रोज सकाळी ५-६ भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते. बदाममध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीरातील रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करते आणि अशक्तपणा दूर होतो.
हेही वाचा - उन्हाळ्यात तुमचा चेहरा थंड ठेवतील हे 5 फेस पॅक, कसे वापरायचे ते जाणून घ्या
मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीव्र करण्यासाठी बदाम हा उत्तम पर्याय मानला जातो. दररोज ५-६ भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूचे कार्य सुधारतं. एकाग्रता वाढते आणि अल्झायमरसारख्या समस्या टाळता येतात.
हेही वाचा - डिहायड्रेशन आणि उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या स्वतःची काळजी
बदाममध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळं हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात, जे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करतात.
बदाममध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी उत्तम मानले जातात. दररोज ५-६ भिजवलेले बदाम खाल्ल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते. डाग-पुरळ कमी होतात आणि अँटी-एजिंग प्रभाव दिसून येतो.