आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात स्पॅम कॉल्स

स्पॅम कॉल म्हणून कट करत राहिला, सत्य समोर आलं तेव्हा हातचं गेलं!

आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात स्पॅम कॉल्सचा भडिमार होत आहे. दिवसाला अनेक अनोळखी नंबरवरून कॉल्स येतात आणि लोक सायबर फ्रॉडच्या भीतीने ते उचलण्याचं टाळतात. पण कल्पना करा, जर एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची संधी असलेला कॉल तुम्ही स्पॅम समजून कट करत राहिलात, तर?

अशीच एक धक्कादायक घटना एका व्यक्तीसोबत घडली. त्याला सातत्याने एका अमेरिकन नंबरवरून कॉल येत होते, पण त्याने त्यांना स्पॅम समजून उचललंच नाही. जवळपास एक महिनाभर हे सुरू राहिलं. अखेरीस, उत्सुकतेपोटी त्याने त्या नंबरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि जे सत्य समोर आलं, ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली!

हेही वाचा : मेटा AI साठी वेगळे अॅप लाँच करणार; ChatGpt आणि Gemini ला देणार टक्कर

तो कॉल कुठल्याही सायबर फ्रॉडचा नव्हता, तर थेट अमेझॉनच्या स्टाफ सिलेक्शन टीमकडून आला होता! होय, त्याला अमेझॉनकडून नोकरीसाठी संपर्क केला जात होता, पण स्पॅम समजून त्याने ती संधीच गमावली.

जेव्हा त्याला हे कळालं, तेव्हा त्याने ताबडतोब त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण उशीर झाला होता. फोनवर ऑटोमॅटिक उत्तर आलं की, “हा नंबर आता उपलब्ध नाही.”ही घटना त्याने रेडिटवर शेअर केली आणि लोकांनी त्याला सल्ले द्यायला सुरुवात केली. काहींनी सांगितलं की, मोठ्या कंपन्या कॉलसोबत ई-मेल पाठवतात, त्यामुळे त्याने मेल तपासायला हवा.

हेही वाचा : Blue Ghost Mission: अमेरिकेचे ब्लू घोस्ट लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; अनेक रहस्ये उलगडणार, काय आहे खास? जाणून घ्या

या प्रसंगातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, प्रत्येक अनोळखी कॉल स्पॅमच असेल असं नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता. पण त्याचवेळी, सायबर फ्रॉडपासून सावध राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे!