धाराशिव जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघात ४७ मनोज जरांग

धाराशिवमध्ये दोन जरांगे समर्थक निवडणुकीवर ठाम

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघात ४७ मनोज जरांगे पाटील समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ४५ उमेदवारांकडून आपले अर्ज मागे घेण्यात आले असून दोघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे .भूम परंडा वाशीमधून दिनेश मांगले तर तुळजापूर मतदारसंघातून योगेश केदार या दोन जरांगे समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे न घेता कायम ठेवले आहेत.