उदगीर येथे बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते विश्वशांती बुद्धविहाराचे लोकार्पण

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्धविहार लोकार्पण झाले. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियान कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. 

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे याच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित होते.