Gold Reserves: भारताला लागली लॉटरी; 'या' राज्यात सापडलं सोन्याचं घबाड; जाणून घ्या
Odisha gold reserves: भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची पुष्टी झाली आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाने (GSI) दिलेल्या माहितीनुसार, देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचे आढळले आहे.
याशिवाय मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे अजूनही शोधमोहीम सुरु असल्याचे मार्च 2025 मध्ये राज्याचे खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी विधानसभेत सांगितले.अद्याप अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी, मीडिया रिपोर्टनुसार या साठ्याची एकूण अंदाजे 10 ते 20 मेट्रिक टन (100,000 ते 200,000 किलो) आहे. भारत दरवर्षी सुमारे 700–800 मेट्रिक टन सोने आयात करत असल्यामुळे, हे प्रमाण तितकेसे मोठे नसेल, तरी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने हा मोठा आणि सकारात्मक शोध मानला जात आहे. हेही वाचा: Stock Market Update : शेअर बाजार तेजीत; तर 25 जुलैनंतर पहिल्यांदाच निफ्टी 25 हजारांवर ओडिशा राज्य आता भारताच्या सोन्याच्या नकाशावर नवीन सुवर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाने या प्रदेशातील सोन्याचे साठे ओळखल्यामुळे खाणकामाच्या योजना, लिलाव आणि उद्योगातील गुंतवणुकीसाठी उत्सुकता वाढली आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर उद्योग आणि गुंतवणूकदार यांचा या प्रदेशाकडे लक्ष लागले आहे.
सोन्याची ही सापडलेली संपत्ती आर्थिक दृष्ट्या राज्यासाठी महत्वाची ठरणार आहे. स्थानिक रोजगार निर्माण होण्यास मदत होईल तसेच राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल. या सापडलेल्या खजिन्यामुळे राज्याचे खाण उद्योग विकसित होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ओडिशा हे भारताचे सोन्याचे नवीन केंद्र बनून देशाच्या सोन्याच्या उत्पादनातही वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
विशेष म्हणजे, भारतासाठी सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरते. परदेशावर अवलंबून राहण्याऐवजी देशांतर्गत सोन्याचे उत्पादन वाढवणे हे आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. ओडिशामध्ये सापडलेला सोन्याचा खजिना हे देशाच्या संपत्तीमध्ये भर घालणारा आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आशादायी शोध ठरणार आहे.
हेही वाचा: Billionaires of India : अंबानी कुटुंबाकडे अदानींपेक्षा दुप्पट संपत्ती; बहुतेक अब्जाधीश 'या' शहरातले अधिकार्यांनी सांगितले की, ओडिशातील सोन्याचे खाणीतील साठे अधिक खोलवर आणि विस्तृत प्रदेशात असू शकतात. त्यामुळे पुढील काही वर्षांत या प्रदेशातील सोन्याच्या शोधात वाढ होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि खाण उद्योगात मोठ्या प्रमाणावर प्रगती होण्याची शक्यता आहे.
संपत्तीच्या दृष्टीने हे राज्य आता भारताच्या सोन्याच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि GSI यांच्यामध्ये समन्वय साधून या साठ्याचा अधिकतम फायदा घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.